भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे २९२ धावांचे आव्हान
   दिनांक :13-Mar-2019
नवी दिल्ली,
भारत आणि ऑस्ट्रेलियात आज पाचवा आणि अंतिम वन-डे सामना सुरू आहे.  या सामन्यात उस्मान ख्वाजाचे शतक (१००) आणि पीटर हॅंड्सकॉम्बच्या अर्धशतकच्या (५२) जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २७३ धावांचे लक्ष ठेवले आहे.
 
 
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४३ चेंडूत २७ धावा करणाऱ्या कर्णधार फिंचला लवकर माघारी परतावे लागले. रवींद्र जाडेजाने त्याला त्रिफळाचित केले. त्याने खेळीत ४ चौकार लगावले. ख्वाजाने शतक ठोकले. त्याने १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. ख्वाजापाठोपाठ स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेल आजच्या सामन्यात लवकर बाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. त्यानंतर जाडेजाने त्याला झेलबाद केले. गेल्या सामन्यात शतक झळकावलेल्या पीटर हॅंड्सकॉम्बने संयमी अर्धशतक केले. या खेळीत त्याने ४ चौकार खेचले. मात्र, अर्धशतक ठोकल्यावर तो लगेच बाद झाला, त्याने ६० चेंडूत ५२ धावा केल्या. गेल्या सामन्यात धमाकेदार ८४ धावांची नाबाद खेळी करणारा धोकादायक ऍस्टन टर्नर झेलबाद झाला. त्याने २० धावा केल्या. स्टॉयनिस (२०), कॅरी (३), कमिन्स (१५) हे फलंदाजदेखील झटपट बाद झाले. पण तळाच्या फळातील झाय रिचर्डसन याने २१ चेंडूत २९ धावा करून ऑस्ट्रेलियाला २७२ धावांपर्यंत मजल मारून दिली.
 
 
२-२ अशी मालिका बरोबरीत असताना हा सामना जिंकणे मालिका विजयाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मालिकेतील पहिले २ सामने भारताने जिंकले आहेत, तर दुसरे २ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या अंतिम सामन्यात विजयी होणारा संघ मालिका जिंकणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान फिरोजशाह कोटला मैदानावर चार एकदिवसीय सामने खेळले गेले असून त्यापैकी तीन सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच या मैदानावर भारताने खेळलेल्या १९ पैकी १२ एकदिवसीय सामनेही भारताने जिंकले आहेत. विश्वचषकाआधीचा हा भारताचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.