'कलंक' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित
   दिनांक :13-Mar-2019
मुंबई :
 बॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित 'कलंक' या चित्रपटाचा भव्यदिव्य टीजर प्रदर्शित झाला. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या दोन मिनिटांच्या टीजरमध्ये चित्रपटाची भव्यता पाहायला मिळते. 
 
 
 
 इतकी मोठी स्टारकास्ट, डोळे दिपवणारे सेट्स पाहिल्यानंतर या चित्रपटाची कथा काय असेल याची उत्सुकता प्रत्येकाला आहे.  चित्रपटाची साधारण कथा जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.या चित्रपटात आलिया भट्ट 'रुप' नावाच्या राजकुमारीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.वरुण आणि आलिया मध्यवर्ती भूमिकेत असले तरी या चित्रपटाच्या पोस्टर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.