रेल्वेची मेगाभरती; ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात
   दिनांक :13-Mar-2019
नवी दिल्ली :
 रेल्वेमधील ‘ग्रुप डी, लेव्हल १’ मधील १,०३,७६९ पदे भरण्याची प्रक्रिया रेल्वे ‘रिक्रुटमेंट बोर्डा’ने (आरआरबी) मंगळवारी सुरु केली आहे. 
 
 
 
विविध भागात १८ प्रादेशिक रेल्वे रिक्रुटमेंट सेल असून उमेदवाराने आपल्या भागातील ‘आरआरसी’कडे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याची वेबसाइट मंगळवार खुली झाली. अर्ज २६ एप्रिलपर्यंत करता येतील. ट्रॅक मेन्टेनर ग्रेड ४, विद्युत, यांत्रिकी व सिन्गल आणि दळणवळण या विभागात सहाय्यक, सहाय्यक पॉईन्ट्समन वगैरे प्रकारची ही पदे आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३१ वर्षे असून, दहावी उत्तीर्ण तसेच ‘आयटीआय’ उत्तीर्ण वा अ‍ॅप्रेंटिसशिप यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अशी शैक्षणिक अर्हता आहे. सातव्या वेतन आयोगानुसार या पदांचा पगार दरमहा १८ हजार रुपये आहे.
महत्त्वाच्या तारखा
१२ मार्च : अर्ज भरण्याची सुरुवात
१२ एप्रिल : अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
१८ एप्रिल : पोस्ट व स्टेट बँकेतून शुल्क भरण्याचा शेवटचा दिवस
२३ एप्रिल : अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरण्याचा शेवटचा दिवस
२६ एप्रिल : शुल्कासह परिपूर्ण अर्ज दाखल करण्याची मुदत
सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ : संगणकावर लेखी परीक्षेचा कालावधी