पाकिस्तानकडून पुंछमध्ये गोळीबार; एलओसीवरील व्यापार बंद
   दिनांक :13-Mar-2019
पुंछ:
 बालाकोटमध्ये भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने आज पुन्हा पुंछमध्ये गोळीबार केले आहे. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) ट्रेड सेंटरवरच पाकिस्तानने शेल्सचा मारा केल्याने एलओसीवरील भारत-पाक दरम्यानचा व्यापार बंद करण्यात आला आहे.
 
 
 दा बाग येथे असलेल्या ट्रेड सेंटर या व्यापारी केंद्रावर पाकने दोन शेल्सचा मारा केला. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोळीबारही केला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने भारत-पाक दरम्यानचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या आधी पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाक दरम्यानचा व्यापार बंद ठेवण्यात आला होता.
.