शेतकरी बांधवासाठी काही महत्त्वाचे मोबाईल ॲप
   दिनांक :13-Mar-2019
 
१. किसान सुविधा (भारत सरकार - कृषि मंत्रालय)
भारत सरकार - (कृषि मंत्रालय) व्दारे निर्मित किसान सुविधा या ॲपव्दारे आपणास हवामान विषयक माहिती, तसेच आपल्या भागातील कृषि निविष्ठा विक्रत्याची नावे पत्ते, फोन नंबर, विविध पिकांचे बाजारभाव, कीड व रोग नियंत्रण, माती परीक्षण अहवाल, शित गृह, साठवण गोदाम, किसान कॉल सेंटरची माहिती व तसेच पशुसंवर्धन इत्यादी बद्दलची माहिती उपलब्द आहे.
 
२. ईफको किसान (इफको)
इफको किसान (ईफको) व्दारे निर्मित इफको किसान या ॲपमुळे हवामान विषयक माहिती शेती विषयक माहिती, उदयानविद्या तसेच आपल्या भागातील कृषी विके्रता व खरेदीदार, शेताविषयक बातम्या, ग्रथांलय, विविध पिकांबाबत सल्ला, बाजारभाव, प्रश्न तज्ज्ञास विचारा... इत्यादी माहिती या मोबाईल ॲपव्दारे आपणास मिळविता येते.
 

 
 
३. फार्मस पोर्टल इंडिया (भारत सरकार - कृषि मंत्रालय)
भारत सरकार - कृषि मंत्रालय व्दारे निर्मित फार्मस पोर्टल इंडिया या ॲपमुळे सुद्धा शेेती विषयक माहिती, हवामान विषयक माहिती, उदयानविद्या, पशुसंवर्धन, तसेच आपलया भागातील कृषि निविष्ठा, विविध पिकांचे बाजारभाव, कीड व रोग नियंत्रण, माती परीक्षण सुपीकता नकाशा, निर्यात व आयात पशु गणना इत्यादी माहिती या ॲपव्दारे आपणास मिळविता येते.
 
४. डी इ इ पि डे के व्हि- ट्रासफर ऑफ टेक्नोलॉजी /विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसार " DDE PDKV  Transfer of Technology" (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाव्दारे निर्मित डी इ इ पि डे के व्हि- ट्रासफर ऑफ टेक्नोलॉजी या ॲप वर विद्यापीठ निर्मित विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान जसे कपासी, सोयाबीन, तेलबिया, कडधान्य, धान, उस, गहू, ज्वारी, कृषि औजारे, विविध पिकांवरील कीड व रोग नियंत्रण, कृषि शिक्षण, कृषि संशोधन, विस्तार शिक्षण कार्यक्रम, विद्यापीठ प्रकाशने, विस्तार शिक्षण उपक्रम इत्यादी माहिती आपणास मिळविता येते. तसेच आपल्या प्रतिक्रिया सुध्दा यावर देता येतात व अधिक माहिती करिता संपर्क करण्याकरिता या ॲपवर माहिती उपलब्ध आहे. तसेच या अॅपचा फायदा आतापर्यंत जवळपास विस हजारा पेक्षा जास्त शेतकर्‍यांना करुन घेतला आहे. तरी इतर शेेतकर्‍यांनीसुद्धा विद्यापीठ निर्मित लागवड तंत्रज्ञान करिता हा ॲप डाउनलोड करुन फायदा घ्यावा व या बाबत व आपल्या सर्ंपकातील इतर शेतर्‍यांना सुध्दा अवगत करावे.
• अनिल गोमासे
• डॉ. पंकज भोपळे
•    डॉ. विष्णूकांत टेकाळे
विस्तार शिक्षण विभाग, 
डॉ. पं. दे. कृ. विद्यापीठ, अकोला