गावठी दारूची विक्री करणारे गजाआड
   दिनांक :13-Mar-2019
मालेगांव,
मालेगांव पोलिस ठाण्याच्या हद्दी सुरु असलेल्या अवैध धंदयावर उपविभागीय पोलिस अधिकारी पवन बनसोड यांनी मालेगाव पोलीस पथकासह आज धाडसत्र मोहिम राबविली. यामध्ये तालूक्यातील मेडशी येथे गावठी दारूची अवैध विक्री करताना दोघं जणांना रंगेहात पकडले.  त्यांच्याजवळून गावठी दारुच्या दोन कॅन जप्त करण्यात आल्या आहे.  सुभान गंगा गौरवे व रवि चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून ते मेडशी येथे राहात्या घरात गावठी दारुची विक्री करत होते.
 
 
 
जप्त करण्यात आलेल्या ५० लिटर गावठी दारूची अंदाजे किंमत दोन हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
 
आगामी लोकसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर तालूक्यातील अवैध धंदयावर पोलिस नजर ठेवून असल्याने धाडसत्र मोहीमेला जोरात सुरुवात झाली आहे. अवैध धंदयाच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.