सीएसटी रेल्वे स्थानकाजवळील पूल कोसळला
   दिनांक :14-Mar-2019
मुंबई :
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारी आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.