अजीम प्रेमजींनी समाजसेवासाठी दान केले ५३ हजार कोटी
   दिनांक :14-Mar-2019
नवी दिल्ली
आयटी कंपनी विप्रोचे मालक अजीम प्रेमजी यांनी 52,750 कोटी रुपयांचे शेअर अजीम प्रेमजी फाउंडेशनला दान केले आहेत. प्रेमजी यांच्या शेअर्समुळे होणाऱ्या आर्थिक लाभाचा वापर फाउंडेशनच्या कामासाठी केला जाणार आहे. या देणगीनंतर फाउंडेशनच्या कामाता पैशाची अडचण येणार नसल्याचं अजीम प्रेमजी फाउंडेशनने जाहीर केलं. अजीम प्रेमजी फाउंडेशनने म्हटलं की, अजीम प्रेमजी यानी आपली जास्तीत जास्त संपत्ती दान करुन समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी वाढवली आहे. ज्यामुळे अजीम प्रेमजी फाउंडेशनला सामाजिक कार्यासाठी अधिक निधी उपलब्ध होणार आहे.
 
 
अजीम प्रेमजी फाउंडेशनने बंगळुरुत प्रेमजी विद्यापीठाची स्थापना केली आहे. गुणवतं विद्यार्थी घडवणे हा या विद्यापीठाचा उद्देश आहे. शिक्षणाच्या कार्याला वेग मिळावा यासाठी प्रेमजींनी मोठी दान केली आहे. अजीम प्रेमजी यांनी आजवर 1 लाख 45 हजार कोटी रुपये दान केले आहेत. बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांनी सुरु केलेल्या अभियान 'द गिविंग प्लेज'वर सही करणार अजीम प्रेमजी पहिले भारतीय होते. या अभियानातंर्गत जगातील श्रीमंत लोक आपल्या कमाईतील जास्तीत जास्त हिस्सा सामाजिक कार्यासाठी दान करतात.