चाहत्याने म्हंटले करीनाला 'आंटी' आणि नंतर ....
   दिनांक :14-Mar-2019
 
 
आगामी वेब सीरिज 'पिंच'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यानंतर एका चाहत्याने करीनाला 'ट्रोल' करत चक्क आंटी म्हणून संबोधले. 'आता तू एक 'आंटी' आहेस... एका तरूणीची भूमिका करणं बंद कर' असा सल्ला या चाहत्याने करीनाला दिला.
 

 
 
 
 
चाहत्यांच्या या कमेंटवर करीना चांगलीच संतापली. प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री यांच्यात कोणतीही भावना नसते. आम्हाला अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागेल, असं करिनानं म्हटलंय.  वेब सीरिज 'पिंच' संबंधी करिना कपूरसह सोनाक्षी सिन्हा, करण जोहर, सोनम कपूर आहूजा आणि कपिल शर्मा अरबाज खानसोबत चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान, सध्या करिना कपूर तिच्या आगामी 'गुड न्यूज' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.