आलिया भट्ट निघाली टॉलीवूडच्या वाटेवर
   दिनांक :14-Mar-2019
आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज करणारी आलिया भट्ट आता साऊथच्या वाटेवर निघाली आहे . ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आर आर आर’ या आगामी चित्रपटात आलिया भट्टची एन्ट्री झाली आहे.
अनेकांचा या बातमीवर विश्वास बसणार नाही. कारण, काल-परवापर्यंत आलियाने राजमौलींच्या ‘आर आर आर’ची ऑफर नाकारली, अशी बातमी होती. पण आता बातमी एकदम खरी आहे. खुद्द राजमौली यांनीच आलियाच्या एन्ट्रीची अधिकृत घोषणा केलीय.
 
हैदराबादेत मीडिया टुडेशी बोलताना राजमौलींनी ही घोषणा केली. ‘आर आर आर’मध्ये आम्ही आलियाला साईन केले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत आम्ही आलियाला भेटलो आणि आपल्या प्रोजेक्टचीऑफर दिली. आलियाला हा प्रोजेक्ट आवडला आणि तिने यात काम करण्यास होकार दिला. आलिया भट्ट या चित्रपटात रामचरणच्या अपोझिट दिसेल. आलिया आमच्या चित्रपटात काम करणार, याचा आम्हाला आनंद आहे, असे राजमौलींनी सांगितले. ‘आर आर आर’च्या ट्विटरवरून ऑफिशिअल पेजवरही याची घोषणा करण्यात आली आहे.