चीनवर संतापले नेटीझन्स
   दिनांक :14-Mar-2019
नवी दिल्ली :
पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याला चीनने विरोध केला. संयुक्त राष्ट्र संघात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटेनला आणलेल्या प्रस्तावाला चीनने व्हिटो पावर वापरुन अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. चीनने दहशतवादी मसूद अजहरची केलेली पाठराखण यावर सोशल मिडीयामध्ये अनेकांना संताप व्यक्त केला.
 
 
चीनने या प्रस्तावाचा विरोध करत भारताच्या प्रयत्नांना खोडा घातला. यानंतर सोशल मिडीयावर चीनच्या विरोधात अनेक संतापाचे संदेश व्हायरल झाले. आता ट्विटरवर #BoyottChineseProduct असा ट्रेंड सुरु आहे.
 
 
सोशल मिडीया युजर्सकडून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचसोबत #ChinaSupportsTerrorism असाही ट्रेड युजर्सकडून वापरुन चीनचा विरोध करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघात मसूद अझहरच्या विरोधातील हा चौथा प्रस्ताव आहे. याआधीही चीनने या प्रस्तावाला विरोध केला आहे.
 
 
चीनने याआधी २००९, २०१६ आणि २०१७ या साली मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला व्हिटो पावरचा वापर करुन विरोध केला होता. प्रत्येक वेळी चीनच्या विरोधात ट्विटरवर ट्रेंडींग होते.