'हे' कलाकार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
   दिनांक :14-Mar-2019
२०१९ची लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वत्र निवडणुकीचे वातावरण तयार झालं आहे. पक्षांनी आपली उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. अनेक पक्षांनी चित्रपटातील कलाकारांना ही तिकीट दिले आहेत. सध्यातरी टीएमसीनेच सर्वाधिक अभिनेत्रींना तिकीट दिले आहेत. तर इतर पक्षांनीही काही कलाकारांना तिकीट दिले आहेत.

 
 
कोलकाता शहरातील बशीरहाट येथून ममता बॅनर्जींनी अभिनेत्री नुसरत जहाँला तिकीट दिलं आहे. आपल्या छोट्याशा करिअरमध्ये तिने कितीतरी टॉप स्टार्ससोबत काम केलं आहे. २०११मध्ये नुसरत जहाँने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. मिमि चक्रबर्तीला जाधवपूरहून तिकीट देण्यात आलं आहे. मिमि चक्रबर्ती मुळची जलपायगुडीची आहे. 'बापी बारी जा' या बंगाली चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. सध्या ती जाधवपूरहून सांसद आहे.
शताब्दी रॉयला बीरभूमहून तिकीट देण्यात आलं आहे. त्यांनी १९८६मध्ये आंतक या चित्रपटापासून कामास सुरुवात केली होती. रॉय २००९पासून बीरभूमच्या खासदार आहेत. आसनसोलची उमेदवारी ममता बॅनर्जींनी मुनमुन सेन यांना दिली आहे. सध्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रिययो आसनसोलचे खासदार आहेत. सध्या त्या बाँकुराहून खासदार आहेत .
आपल्या चित्रपटातील भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारे राज बब्बर यंदा काँग्रेसच्या मुरादाबादहून निवडणुकीसाठी उभे आहेत. राज बब्बर उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षदेखील राहिले आहेत. ते तीनदा लोकसभेवर आणि दोनदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी जखमी औऱत, जज्बात, इंसाफ का तराजू, उमराव जान, राज ,प्रेमगीत सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.