सदानंद बोरकर यांना 'कलावन्त पुरस्कार' घोषित
   दिनांक :15-Mar-2019
चंद्रपूर,
नाशिक येथील सामाजिक कलावंत विचारवंत संस्था आणि कमल फिल्म प्रोडक्शन च्या संयुक्त विध्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही लोककवी वामनदादा करडक, कवी वसंत बापट, शाहीर अमर शेख, दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त कवियत्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिनाचे औचित्य साधून देशभरातील विविध क्षेत्रातील कलावंताना सन्मानित करण्यात येणार आहे. यात हैद्राबाद येथील चित्रपट दिग्दर्शक सत्यनारायण जाधव यांना राष्ट्रीय पुरस्काराने तर विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या १५ कलावंतांना राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्धल सदानंद बोरकर यांचाही राज्यस्तरीय कलावन्त पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
 

 
 
माझं कुंकू मीच पुसलं!, आत्महत्या, नवरे झाले बावरे, अस्सा नवरा नको गं बाई आणि गंगाजमुना ह्या सामाजिक नाटकाचे त्यांनी लेखन आणि दिग्दर्शक केले असून सर्व नाटकांमध्ये अभिनय केला आहे. ३१ मार्च रोजी नाशिक येथील आय.एम.ए. हॉल येथे दुपारी १२ वाजता एका छोटेखानी समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.