लवकरच येणार आमिरचा 'लाल सिंह चड्ढा'
   दिनांक :15-Mar-2019
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने काल आपला ५४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांनतर त्याने नेहमी प्रमाणे त्याने माध्यमांशी संवाद साधला. त्याची पत्नी किरण राव सुद्धा यावेळी त्याच्या सोबत होती. वाढदिवसाचे औचित्य साधून आमिरने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात आमिर झळकणार आहे. 
 

 
 
हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचे हे ऑफिशिअल ॲडप्शन असणार आहे. अद्वेत चंदन या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. अद्वेतने याआधी 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 'फॉरेस्ट गंप' सिनेमात हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम हॅक्सने मुख्य भूमिका साकारली. या सिनेमाला बेस्ट ॲपिश्चरसाठी कॅडमी अवॉर्डही मिळाला आहे. गेल्या वर्षी आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. आमिर खान वर्षातून एकाच चित्रपटात झळकतो. त्यामुळे मागील वर्ष आमिरसाठी अपयशी ठरले. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.