धारदार शस्त्रासह बबलु खान याला अटक
   दिनांक :15-Mar-2019
- शहरात काही काळ तणाव
 
 
 
वाशीम,
आगामी लोकसभा निवडणुक निर्भय वातावरणात पार पडाव्यात याकरीता जिल्हा पोलिस प्रशासनाने गेल्या तीन दिवसापासून गुन्हेगारीविरुद्ध धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून, या मोहीमे अंतर्गत शहरातील कुख्यात गुन्हेगार बबलू खान याच्या घरी छापा मारला. त्याच्या घरातून पोलिसांनी धारदार शास्त्रे जप्त केली असून बबलु खान यास ताब्यात घेतले आहे.
 
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासन सतर्क असून, निवडणूक काळात अनुचीत प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने गुन्हेगार चेकिंग व कोबींग ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. आज पोलिसांनी पहाटे ४ वाजातापासुन या ऑपरेशन राबवण्यात येत असताना. शहरातील कुख्यात गुंड बबलु खान उर्फ शे. फिरोज शे. ईस्माईल याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना तेथे शस्त्रे मिळाली. स्वतःवरील कारवाई टाळण्याच्या उद्देशाने बबलु खान याने त्यातील एका शस्त्राने मांडीवर वार करुन स्वतःला जख्मी करुन त्याचा आरोप पोलिसांवर करुन वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न केला.
 
काही लोकांकडून शहरात प्रतिष्ठाने बंद करण्याचा प्रयत्न होत असताना तो पोलीस प्रशासनाने हाणुन पाडला. संबंधीतांवर कायदेशिर कार्यवाही सुरु आहे.