आजचे राशी भविष्य, दि. १५ मार्च २०१९
   दिनांक :15-Mar-2019
 
 
मेष : काल्पनिक विश्वात दिवस घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ.
 
वृषभ: योजने प्रमाणे कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. गृहस्थीजीवनात गोडी राहील.  
 
मिथुन : सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्यापिण्याचा आनंद लुटाल.
 
कर्क : आळस आणि जास्त कामाचा भार यामुळे मनाची व्याकुळता राहील. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने आरोग्याला घातक अन्न ग्रहण करू नका. 
 
सिंह :  तब्बेत सांभाळून राहा. दूरस्थ स्नेह्यांकडून वार्ता प्राप्त होतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. व्यवसायात बढतीमुळे लाभ होईल.
 
कन्या : कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. व्यापारात नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होण्याची शक्यता. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत दिवस आनंदात जाईल. उत्पन्न वाढेल.
 
तूळ :  रम्य स्थळी सहलीचे बेत आखाल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल.
 
वृश्चिक :  घरात कुटुंबीयांचा विरोध राहील. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक व्यग्रता अनुभवाल. दुपारनंतर कामाचा उत्साह वाढेल. मनोरंजनावर खर्च कराल.
 
कुंभ : धनलाभाची शक्यता. शारीरिक आणि मानसिक दृष्टी या उत्साही राहाल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात द्विधा वाढेल. आलेली संधी गमावून बसाल.
 
मीन : आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ.