किंग्ज इलेव्हनने आयपीएलसाठी कसली कंबर !
   दिनांक :15-Mar-2019
 
जगातली सर्वात मोठी लीग स्पर्धा, अशी ओळख असलेल्या आयपीएलच्या बाराव्या सत्राला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक संघाने जेतेपदासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आर. अश्विनच्या नेतृत्वात मैदानात उतरतोय.  
 

 
 
 
२०१४ साली पंजाबच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मझल मारली होती. पण निर्णायक सामना जिंकण्यात सपशेल अपयशी ठरला. मागील वर्षी या संघाने अश्विनच्या खांद्यावर संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली. सुरुवातीच्या काही सामन्यात संघाने दमदार कामगिरी केली. पण शेवटपर्यंत कामगिरीत संघाला सातत्य दाखविता आले नाही. परंतु यंदा या संघाने काट्याची टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. संघातले खेळाडू  प्रशिक्षक माइक हेसन यांच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरवत आहे. 
 
असा आहे किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ
रविचंद्रन अश्विन , केएल राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, करुण नायर, डेविड मिलर, अंकित राजपूत, मुजीब उर रहमान, वरुण चक्रवर्ती, सॅम कर्रन, मोहम्‍मद शमी, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, मोइजेस हेनरिक्स, हार्डस विल्जोएन, दर्शन नाल्कंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंह, अग्निवेश अयाची, हरप्रीत बरार, मुरुगन अश्विन