मॅन्चेस्टर सिटीला ४ जेतेपदाच्या संधी
   दिनांक :15-Mar-2019
स्वानसी : पेप ग्वार्डियेला यांच्या मार्गदर्शनाखाली मॅन्चेस्टर सिटीला यंदा चार विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. शनिवारी एफए चषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात मॅन्चेस्टर सिटीला स्वानसी संघाविरुद्ध दोन हात करायचे आहे. मॅन्चेस्टरने हा सामना जिंकला, तर त्यांचा चार विजेतेपद पटकावण्याचा मार्ग प्रशस्त होईल. अलिकडेच मॅन्चेस्टर सिटीने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना अंतिम सोळाच्या दुसर्‍या चरणाच्या सामन्यात शेल्क संघाचा सरळ 7-0 ने धुव्वा उडविला. गत महिन्यातच मॅन्चेस्टर सिटीने चेल्सीवर मात करून लीग कप जिंकला होता.