मनोहर जोशींची गडकरींच्या निवास्थानी सदिच्छा भेट
   दिनांक :15-Mar-2019
 
 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी यांची गडकरी यांना रामनगर स्थित घरी सदिच्छा भेट
 
 
 नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी नागपूर दौऱ्यावर आले होते. नागपुरात त्यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.  यावेळी गडकरींनी मनोहर जोशींचे चरणस्पर्श करीत आशीर्वाद मागितला.