आणि नागपुरात नाना पडले...
   दिनांक :15-Mar-2019
 
 नागपूर : काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत नागपुरातून निवडणूक लढवणारे नाना पटोले यांचे आहे दिल्लीहून नागपूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. मात्र कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचे स्वीकार करत समोर जात असताना रेल्वे स्थानक परिसरातील असलेल्या दुभाजक ओलांडताना काही कार्यकर्ते आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले अचानक खाली पडले.
उमेदवारी अर्ज भारण्याआधीच कॉंग्रेसचा उमेदवार पडला अशी चर्चा यावेळी रंगली. दरम्यान २१ मार्च पासून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरवात होणार आहे.