जहीर खानने मुंबईकरांशी साधला मराठीतून संवाद
   दिनांक :15-Mar-2019
 
क्रिकेट प्रेमी ज्या आयपीएल लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत ती येत्या २३ मार्च पासून सुरु होणार आहे. क्रिकेट प्रेमींमध्ये या स्पर्धेबद्दल कमालीची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट संचलन निदेशकपदी असलेल्या झहीर खानने शुद्ध मराठीतून क्रिकेटचाहत्यांना सामने पाहायला येण्याचे आवाहन केले आहे. 
 

 
 
 
आयपीएलच्या १२ व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार असून पहिली लढत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत २४ मार्चला वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.