चीन, भारत हे आक्रमणकारीच
   दिनांक :16-Mar-2019
- हल्लेखोराच्या जाहीरनाम्यातील वर्णन
- 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
ख्राइस्टचर्च,
न्यूझीलंडमधील भारतीय हे शत्रूच आहेत, असे वर्णन न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणार्‍या दहशतवादी ब्रेंटन टॅरंटने केले आहे. टॅरंटचा 74 पानी जाहीरनामा जगापुढे आला आहे. या 74 पानी जाहीरनाम्यात भारत, चीन आणि तुर्कस्थानचा उल्लेख असून, त्याने भारतीयांना ‘आक्रमक देश’ म्हटले आहे. भारत, चीन आणि तुर्कस्थान हे तीन आक्रमणकारी देश असून, पूर्वेकडचे हे देश शत्रू असल्याचे त्याने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. टॅरंटने शुक्रवारी दोन मशिदींमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 49 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन भारतीय जखमी झाले असून, नऊ जण बेपत्ता आहेत.
 
 
 
प्रश्नोत्तराच्या स्वरुपात हा जाहीरनामा आहे. दोन वर्षांपूर्वी आपण या हल्ल्याचा कट आखला होता. ख्राइस्टचर्चची निवड तीन महिन्यांपूर्वी केली, असे या दहशतवाद्याने म्हटले आहे. ‘द ग्रेट रिप्लेसमेंट,’ असे या जाहीरनाम्याचे शीर्षक असून, हे आक्रमणकारी कुठून वा कधीही आले असतील, तरी त्यांना युरोपच्या भूमीवरून हद्दपार केले पाहिजे. ते आपले लोक नसून, ते आपल्या भूमीवर राहत आहेत. त्यांना इकडून बाहेर काढलेच पाहिजे, असे टॅरंटने म्हटले आहे.
बंदूकविषयक कायद्यामध्ये बदल करणार
दरम्यान, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेिंसडा आर्डर्न यांनी अशा िंहसाचाराला न्यूझीलंडमध्ये अजिबात स्थान नाही, असे म्हटले आहे. न्यूझीलंडमधील बंदूकविषयक कायद्यामध्ये बदल करणार असल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेस सांगितले. टॅरंटला आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. 28 वर्षीय टॅरंट हा ऑस्ट्रेलियन नागरिक असून, त्याला ख्राइस्टचर्च येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला बेड्या घालण्यात आल्या होत्या. न्यायालयाने नेमलेल्या त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला नाही. स्थानिक न्यायालयाने त्याला 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दक्षिण आइसलँड उच्च न्यायालयात त्याला पुढील सुनावणीसाठी आता, पाच एप्रिलला हजर करण्यात येणार आहे. त्याच्यावर आणखी आरोप ठेवण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.