गाझामध्ये १०० ठिकाणांवर एअर स्ट्राइक
   दिनांक :16-Mar-2019
जेरुसलेमः
 इस्रायलच्या सैन्याने गाझामध्ये १०० ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहे. इस्रायलने ही कारवाई राजधानी तेल अविववर झालेल्या ४ रॉकेट हल्ल्यानंतर केली आहे. त्यातील ३ रॉकेट इस्रायलच्या रॉकेट डिफेन्स सिस्टीमने निष्क्रिय केले. एएफपीच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या विमानांनी हमासच्या सुरक्षा चौक्यांवर मिसाइल डागल्या असून, इस्रायलनेच याची माहिती सार्वजनिक केली आहे. इस्रायलच्या दाव्यानुसार, त्यांनी हमासच्या १०० लष्करी तळांना टार्गेट केले आहे. हे एअर स्ट्राइक दक्षिणी गाझाच्या खान युनिस भागात करण्यात आले. हे ठिकाण गाझाच्या राजधानीपासून २५ किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे.
 
 
इस्रायलची राजधानी तेल अविववर २०१४ नंतर पहिल्यांदाच रॉकेटने हल्ला करण्यात आला. ९ एप्रिलला इस्रायलमध्ये निवडणुका आहेत, त्याच पार्श्वभूमीवर इस्रायल सेनेने ही कारवाई केली आहे.