सलमानच्या चित्रपटात दिसणार नुसरत भारुचा
   दिनांक :16-Mar-2019
 सलमान खानने आतापर्यंत अनेक नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. कतरिना, जॅकलीन, डेझी, हिमेश, आयुष शर्मा, अशा कितीतरी कलाकारांना सलमानने बॉलिवूडची ओळख करुन दिली. आता या यादीत आणखी एक नाव सहभागी झालं ते म्हणजे नुसरत भारुचा हिचं. खरंतर नुसरत ‘प्यार का पंचनामा २’ , ‘सोनू की टिटू की स्वीटी’ या चित्रपटात झळकली आहे. मात्र सलमानने त्याच्या आगामी चित्रपटासाठी नुसरतची निवड केली आहे. सलमानच्या आगामी चित्रपटात नुसरत महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
सलमान खान या चित्रपटाची निर्मित करत असून या चित्रपटासाठी नुसरतचं नाव फायनल करण्यात आले . मात्र अद्याप या चित्रपटाचं संपूर्ण कास्टिंग बाकी आहे. सध्या या चित्रपटाच्या संवादलेखनाचे काम सुरु असून दिग्दर्शक राज शांडिल्य हे चित्रपटासाठी संवाद लिहीत आहेत. राज शांडिल्य ‘ड्रिमगर्ल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून या चित्रपटात एका लहानशा गावातील प्रेमकथा दाखवली जाणार आहे.