न्यूझीलंड मशिद गोळीबार- दहशतवादीचा जाहीरनामा; भारत, चीन आणि टर्की हे तीन आक्रमणकारी देश
   दिनांक :16-Mar-2019
न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणारा दहशतवादी ब्रेनटॉन टॅरॅन्टचा जाहीरनामा समोर आला आहे. या ७४ पानी जाहीरनाम्यात भारत, चीन आणि टर्कीचा उल्लेख असून त्याने भारतीयांना आक्रमणकारी म्हंटले आहे. भारत, चीन आणि टर्की हे तीन आक्रमणकारी देश असून पूर्वेकडचे हे देश शत्रू असल्याचे त्याने जाहीरनाम्यात म्हटले आहे.
 
 
‘द ग्रेट रिप्लेसमेन्ट’ असे या जाहीरनाम्याचे शीर्षक असून हे आक्रमणकारी कुठून आले किंवा कधीही आले असतील तरी त्यांना युरोपच्या भूमीवरुन हद्दपार केले पाहिजे. ते आपले लोक नसून ते आपल्या भूमीवर राहत आहेत. त्यांना युरोप बाहेर काढलेच पाहिजे असे टॅरॅन्टने त्याच्या जाहीरनाम्यात म्हंटले आहे.
टॅरॅन्टने शुक्रवारी दोन मशिदींमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन भारतीय जखमी झाले असून नऊ जण बेपत्ता आहेत. प्रश्न, उत्तराच्या स्वरुपात हा जाहीरनामा आहे. दोन वर्ष आधी आपण या हल्ल्याचा कट आखला होता. ख्राईस्टचर्चची निवड तीन महिन्यांपूर्वी केली असे या दहशतवाद्याने सांगितले.