पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांची मतदान जागृती
   दिनांक :16-Mar-2019
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी भंडाऱ्यात शाळकरी मुलांनी पथनाट्य सादर केले. निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने त्याच्या मतदानाचा हक्क पार पाडावा. मतदान हा तुमचा अधिकार आहे, ही जागृती मतदारांनामध्ये निर्माण करण्यासाठी पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती. रॅलीमध्ये मुलांच्या हातात वेगवेगळे घोषणा लिहिलेले बॅनर होते. मतदान तुमचा मौलिक अधिकार आहे. 'देश हित+आपले कर्तव्य= मतदान, तुमचे वोट तुमची ताकत बनेल, हे बॅनर घेऊन 'वोट फॉर इंडिया', 'सब काम छोड दो, सबसे पहिले वोट दो' हे नारे लावत विद्यार्थी शहरात निघाले होते.