' मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न संपलेले नाही '
   दिनांक :16-Mar-2019
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न अजूनही संपलेले नाही. चीनने व्हिटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर चीनच्या या भूमिकेचा भारताने निषेध केला आहे. दुसरीकडे अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन अजूनही या प्रकरणी चीनसोबत चर्चा करत आहेत.
 
 
या चर्चेनंतरही चीनने आपली भूमिका बदलली नाही तर हे तीन्ही देश संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावर खुली चर्चा ठेवण्याच्या प्रस्तावावरदेखील विचार करत आहेत. भारताच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत अजूनही काम करत आहे.