'इडाई' चक्रीवादळामुळे २४ जणांचा मृत्यू
   दिनांक :17-Mar-2019
हरारे :
 
 
 
पूर्व झिम्बाब्वेमध्ये आलेल्या 'इडाई' चक्रीवादळामुळे २४ जणांचा मृत्यू झाला असून, ४० जण जखमी झाले आहेत. तसेच काही जण बेपत्ता झाले आहेत. या वादळाचा फटका झिम्बाब्वेचा शेजारी देश मोझाम्बिकलाही बसला आहे. झिम्बाब्वेच्या माहिती आणि सूचना मंत्रालयाच्या वतीने ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.