आजचे राशी भविष्य, दि. १७ मार्च २०१९
   दिनांक :17-Mar-2019
 
मेष : उद्योगधंद्यात, नोकरीत अपेक्षित यश मिळ‍वू शकाल. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. आपणास येणाऱ्या संधीचा लाभ घ्या. खाण्यापिण्याची पथ्ये मात्र पाळा, पोटाचे विकार संभवतात.
वृषभ : आर्थिक बाजू सावरता येईल. आपल्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. प्रवासात सावधानता बाळगा. नको ती आव्हाने स्वीकारू नका. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवास लाभदायक होतील.  

मिथुन : चांगले गृहसौख्य मिळू शकते मात्र विचारांचा प्रवाह बदलण्याची शक्यता. यासाठी मनाची ठेवण शांत व आनंदी ठेवण्याची आवश्यकता असते. कलाकौशल्याच्या क्षेत्रात मोलाची मदत होईल. आपल्या कार्याला हातभार लागेल.
 
कर्क : आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करून घेता येईल. शुक्र-बुध यांच्या साथीने पुष्कळशी प्रकरणे मार्गी लावता येतील, काही अवघड प्रश्नही सोडविता येतील. प्रवास लाभदायक होतील. प्रकृती जपा.
सिंह : पुष्कळशा गोष्टींचे स्वरूप हलके होईल. नोकरीधंद्यात आपले वर्चस्व राहील. मात्र जुने वाद, गैरसमज यांची उजळणी न करता त्यातून बाहेर पडा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. संघर्षाची कारणे टाळण्याचा प्रयत्न करा.
कन्या: कोणताही धोका पत्करू नका. आपली मानसिकता नाजूक असल्याने ती बिघडणार नाही याची दक्षता घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनिक कार्य पार पाडणे शक्य होईल. प्रवास कराल. सत्याची कास धरा आणि त्याचा स्वीकार करा. साहस टाळा.
तूळ: आपल्याला गुप्त कारस्थानाने त्रास होईल. अतिशय मोजून मापून बोलावे लागते, तेव्हा उद्योग व्यवसायात, राजकारणात याचा कटाक्षाने वापर करा. जागा खरेदी-विक्रीच्या कार्यात कागदपत्राची नीट तपासणी करूनच व्यवहार करा.
 
वृश्चिक: आज घरातील वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे, तेव्हा जपा. आपले मोठेपण व मीपणा गाजविण्याचा प्रयत्न करू नका. सध्या शांत व गप्प बसणे हितकारक राहील. एकूण आपल्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच कृती करा.
धनू: आपल्या मनाला बेचैनपणा येण्याची शक्यता आहे, तेव्हा आपल्या मनातील शंका, भीती यांना थारा देऊ नका. आपल्या आत्मविश्वासापासून दूर जाऊ नका. उलटपक्षी तो आपल्या मनात अधिक कसा जागृत होईल यासाठी प्रयत्न करा. घरगुती आनंदाच्या क्षणी त्यात सामील व्हा.
 
 मकर: समस्या व प्रश्न पुढे उभे राहतील. आपल्या कार्यातील स्थितप्रज्ञता आपल्या दैनिक कार्यात मदतीचा हात देईल व त्यातून बाहेर पडणे शक्य होईल. आत्मविश्वास, जिद्द व हुशारी यांचा योग्य उपयोग करून आपण यश मिळवू शकाल.
कुंभ: काही समस्या, गैरसमज या गोष्टींचा समावेश होऊ शकतो, आपले अंदाजही चुकू शकतात. प्रलोभनांना दूर ठेवा. पुष्कळशा अडचणी दूर होतील. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या अपेक्षित गोष्टींना यश मिळेल.
मीन : मानसिक तणाव जाणवेल. जुन्या केलेल्या चुकांचा पच्छाताप होईल. प्रत्येकाचं गोष्ट मनासारखी होणे शक्य नाही, हे सत्य स्वीकारा