अजहर प्रकरणावर लवकरच तोडगा काढू- चीन
   दिनांक :17-Mar-2019
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. व्हिटो पावरचा वापर करुन चीननेमसूद अजहरचा प्रस्ताव रोखून धरला. त्यामुळे चीनच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली. मात्र आता चीनने मसूद अजहर प्रकरणावर लवकरच तोडगा काढू, या प्रस्तावाला आम्ही विरोध केला नसून आम्ही यावर चर्चा करत आहोत असं सांगितले.
 
 
भारतामधील चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांनी सांगितले की, मसूद अजहर प्रकरणवर चीन लवकर तोडगा काढेल, हे प्रकरण तांत्रिक आहे आणि आम्ही मसूद अजहर प्रकरणावर चर्चा करत आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही लवकरच हे प्रकरण सोडवणार आहे. मसूद अजहरबाबत भारताकडून व्यक्त होत असलेली चिंता आम्हाला माहिती आहे असे त्यांनी सांगितले.
 
 
 
 चीनचे म्हणणं आहे की, मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला.