न्यूझीलंड हल्ल्याचा व्हिडियो फेसबुकने हटविला
   दिनांक :17-Mar-2019
ख्राइस्टचर्च :
 न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथील दोन मशिदींवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरानं लाइव्ह केलेला व्हिडिओ फेसबुकनं जगभरातील १५ लाख यूजर्सच्या प्रोफाइलवरून हटवला आहे. त्यातील १२ लाखांहून अधिक यूजर्सच्या प्रोफाइलवरील व्हिडिओ ब्लॉक करण्यात आला आहे. फेसबुकने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली.
 
 
न्यूझीलंडमधील मशिदींवरील हल्ल्यातील बळींचा आकडा ५०च्या वर पोहोचला आहे. बंदुकधाऱ्याने या हल्ल्याचा फेसबुकवर  व्हिडिओ लाइव्ह केला होता. याबाबत पोलिसांनी माहिती दिल्यानंतर तात्काळ हा व्हिडिओ फेसबुकवरून हटविण्यात आला. तसेच त्याचे अकाउंटही काढून टाकण्यात आले. हल्ल्याचे लाइव्ह चित्रण एका कॅमेऱ्यातून करण्यात आले असून तो कॅमेरा हल्लेखोराने  शरीरावर लावला होता.