सुशांतचा इंस्टाग्रामला 'गुड बाय'
   दिनांक :17-Mar-2019
 ‘एम.एस.धोनी’, ‘केदारनाथ’, ‘सोन चिडिया’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर सुशांतचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. नेहमीच चित्रपटांमुळे चर्चेत असलेला सुशांत आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.
 
 
सुशांत सिंगने अचानक इन्स्टाग्रामवरील सर्व फोटो काढून टाकले आहेत. तसेच त्याने असे का केले असावे असा प्रश्न त्याच्या ७८ लाख फॉलोअर्स पडला आहे. ‘सध्या चाहत्यांशी संवाद साधणार नाही’ असे लिहून त्याने इन्स्टाग्रामला रामराम ठोकला आहे. सुशांतच्या या वागण्यामागील खरे कारण आद्यापही समोर आले नाही तसेच चाहते नाराज झाल्याचे समोर आले आहे. ‘सोनचिडिया’ बॉक्स ऑफिसवर अपयशी झाल्यामुळे सुशांतने हा निर्णय घेतला असावा असे म्हटले जात आहे. त्याने या आधीही असे पाऊल उचलले होते.
 
 
सध्या सुशांत ‘छिछोरे’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असून त्यात श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नविन पोलीशेट्टी, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला आणि प्रतिक बब्बर देखील असणार आहेत.