अफगाणी सैनिक तालिबानच्या ताब्यात
   दिनांक :18-Mar-2019
काबूल :
तालिबानशी आठवडाभर चाललेल्या युद्धातून जवळपास १०० अफगाणी सैनिक पलायन केले असून, तुर्कमेनिस्तान या शेजारी देशात जाण्याच्या प्रयत्नात ते बेपत्ता झाल्याचे रविवारी अधिकृत सूत्रांनी सांगितले.
 
 
पश्चिम बदगीस प्रांताचे प्रांतीय कौन्सिल सदस्य महंमद नासेर नाझरी म्हणाले, 'सैनिकांनी सीमा ओलांडून जाणे अपेक्षित नाही. यामुळे त्यांचे भविष्य अंधारात असू शकते.' तालिबानने पकडलेल्या सैनिकांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर पोस्ट केली आहेत. बाला मरघाब तालुक्यात सध्या सुरू असलेल्या युद्धात १६ सैनिक मारले गेले असून, २० जवान जखमी झाले असल्याचे प्रांतीय राज्यपालांचे प्रवक्ते जमशीद शाहबी यांनी सांगितले. ४० पेक्षा जास्त दहशतवादी या युद्धात मारले गेले आहेत. सध्या बाला मुरघाबवर पूर्णपणे तालिबानचे नियंत्रण आहे. तालिबान अफगाणिस्तानवर, विशेषत:, अफगाण सरकार आणि सुरक्षा दलांवर जवळपास दर रोज हल्ले करत आहे.