T-4 वाघिणीचा मृत्यू फास लागल्याने
   दिनांक :18-Mar-2019
 
 शव विच्छेदन अहवालात पुष्टी 
 
यवतमाळ : पंडरकावडा वन्यजीव अभियारण्या अंतर्गत टिपेश्वर अभयारण्य क्षेत्रात १७ मार्चला  T-4 वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या वाघिणीचा मृत्यू गळ्यात तार अडकून फास लागण्याने झाल्याचे शव विच्छेदन अहवालात समोर आले आहे. कक्ष क्रमांक १३३ मध्ये पाणवठ्याजवळ जखमी अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तिला बेशुद्ध करून पशु चिकित्सालयात आणले. दरम्यान रस्त्यातच रात्री ८ वाजता या वाघिणीचा मृत्यू झाला. रात्र झाल्याने शव विच्छेदन करणे शक्य नव्हते. त्यानंतर आज या वाघिणीचे शव विच्छेदन करण्यात आले. त्यात या वाघिणीचा मृत्यू गळ्यात फास लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. शव विच्छेदनानंतर वनाधिकाऱ्यांच्या उपस्थित वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.