आजचे राशी भविष्य, दि. १८ मार्च २०१९
   दिनांक :18-Mar-2019
 
 
 
 
 
मेष : विद्यार्थ्यांसाठी मध्यम काळ. मनःशांतीसाठी आध्यात्म हाच योग्य उपाय राहील. स्थावर मालमत्ते विषयी चर्चा टाळा.
 
वृषभ : साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र यात आज तुम्ही काम करू शकाल. आर्थिक गोष्टींवर लक्ष द्याल. दिवस आनंदात जाईल. 
 
 मिथुन : तुम्ही ठरवलेली कामे पार पडतील ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे तुमचे कीतीतरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी व्यवसायात सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे वातावरण चांगले राहील. 
 
कर्क: आपले मित्रपरिवार व कुटुंबीय यांच्याबरोबर आजचा दिवस चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला मिळेल तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद मिळेल. शुभ समाचार व आर्थिक लाभ ही मिळतील. 
 
सिंह : मन चिंतीत असेल व बेचैनही असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन यावर संयम ठेवणे आवश्यक आहे नाहीतर कोणाशी तक्राक होऊ शकते.
 
कन्या: लक्ष्मीची कृपा आज आपल्याला मिळेल. वाडवडील आणि मित्र यांच्याबरोबर आपला दिवस आनंदात जाईल. प्रवासही घडू शकतो. पत्नी आणि मुले यांच्याबरोबर चांगला वेळ जाईल.
 
तूळ: आज शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास वाढेल. वरिष्ठ आज आपल्याशी नकारात्मक वागतील.
 
वृश्चिक: आज आपले घर आणि कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीचा योग आहे. वरिष्ठ आज तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंदी व उत्साहाचे वातावरण राहील.
 
धनू:  आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नका तसेच तब्येतीकडे लक्ष द्या. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. शस्त्रक्रिया आजच्यासाठी टाळा. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा.
 
मकर: रोजचे काम सोडून आज आपण मनोरंजन आणि गाठी भेटी यात वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांबरोबर फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर चांगला वेळ घालवाल.
 
कुंभ: केलेल्या कामातून यश व कीर्ती मिळेल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तनमनाला उत्साह जाणवेल. नोकरीधंद्यात सहकार्य लाभेल.
 
मीन : आज आपली कल्पनाशक्ती चमकेल. साहित्यनिर्मितीसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती दाखवतील. तुमच्या स्वभावात हळवेवणा व कामुकता राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे.