दीपिकाला व्हायचंय सुपरहिरो
   दिनांक :18-Mar-2019
अभिनेत्री दीपिका पदुकोणला आता सुपरहिरो होण्याचे डोहाळे लागले आहेत. म्हणजेच ॲव्हेंजर्स सिरीजचा भाग होण्याची तिची इच्छा आहे.  ‘xxx’ या हॉलिवूडपटात झळकल्यानंतर आता दीपिकाला मार्व्हल स्टुडिओच्या चित्रपटांतही काम करण्याची इच्छा आहे. आपला अभिनय आणि ओळख फक्त बॉलिवूड पुरताच मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्याची तिची इच्छा आहे. भविष्यात मला सुपरहिरो चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे . मार्व्हलच्या चित्रपटात भारतीय सुपरहिरो साकारायला मला मनापासून आवडेल असं दीपिका म्हणाली. लंडनमधल्या मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकाच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले यावेळी दीपिकाने ॲव्हेंजर्स सीरिजचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली.