नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरात गोळीबार
   दिनांक :18-Mar-2019
मागच्या आठवडयात न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी दहशतवादविरोधी पोलिस उपस्थित असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हंटले आहे.
 
 
 
अनेकजण या गोळीबारात जखमी झाले असून घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले आहे असे युट्रेक्ट पोलिसांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. मदतीसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत.
 
 
स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. पोलिसांनी परिसराला घेराव घातला असून तपास सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले.