मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान श्रेयसला दुखापत
   दिनांक :18-Mar-2019
 
 'माय नेम इज लखन' ही सोनी सब वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे लखनची भूमिका साकारत आहे. श्रेयसचा अभिनय सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे.  या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नुकतीच श्रेयसला दुखापत झाली. 'माय नेम इज लखन' या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान कुस्तीच्या दृश्याचे चित्रीकरण केले जात होते. पण हे दृश्य चित्रीत करताना श्रेयसच्या खांद्याला चांगलीच दुखापत झाली. श्रेयसला चांगलाच मार लागल्याने काही वेळांचा ब्रेक देखील घ्यावा लागला. श्रेयसची दुखापत पाहून मालिकेच्या टीममधील सगळ्यांनाच टेन्शन आले होते. त्यांनी लगेचच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी श्रेयसला तपासले असता त्यांनी सांगितले की, श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली असून त्याला काही दिवस तरी आराम करावा लागेल. पण डॉक्टरांनी दिलेला सल्ला न मानता श्रेयसने काहीच तासांत चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केली. त्याच्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये ही त्याची यामागची भावना होती.