'सेक्रेड गेम्स'ची प्रतीक्षा अखेर संपली !
   दिनांक :19-Mar-2019
 
 
 
नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरीजच्या पहिल्या भागानंतर या वेब सिरीजचे चाहते दुसऱ्या भागाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. १४ दिवसानंतर याचा दुसरा भाग प्रदर्शित होईल असा संदेश नेटफ्लिक्सने दिला आहे. 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
'सेक्रेड गेम्स'मध्ये सैफ अली खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला. तसेच नवाजुद्दीनने गँगस्टर गायतोंडेची भूमिका साकारली आहे. ही वेबसीरीज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारीत होणाऱ्या या वेब सीरीजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
अनुराग कश्यपचे सहदिग्दर्शन असलेल्या 'सेक्रेड गेम्स' या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि जितेंद्र जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता या १४ दिवसांनी 'सेक्रेड गेम्स'बाबत काय नविन घडणार आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.