मुंबई विद्यापीठात आजपासून वसंत नाट्यउत्सव
   दिनांक :02-Mar-2019
१५ वेगवेगळ्या भाषेतील नाटकांची पर्वणी 
 
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ११ व्या राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् आणि नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १० मार्च पर्यंत चालणाऱ्या या नाट्योत्सवाचे आज राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी या प्रमुख अतिथी असणार आहेत.
 
 
 
 या शिवाय नाट्योत्सवात देशभरातील वेगवेगळ्या भाषांमधील १५ नाटकांचे प्रयोग करण्यात येतील . नाट्योत्सवादरम्यान ४ मार्चला हरिष इथापे दिग्दर्शित 'तेरवं' या नाटकाचा प्रयोगही नाट्यप्रेमींना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या नाटकात आत्महत्येचा मार्ग पत्करलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारातील विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली अभिनय करणार आहेत.