जन्म हाच दु:खाचे मूळ आहे
   दिनांक :02-Mar-2019
जन्म हाच दु:खाचे मूळ आहे. श्री समर्थानी दुष्काळाचे कुटुंबाच्या कशा हालअपेष्टा होतात, यांचे अतिशय मार्मिक वर्णन केले. संत तुकारामांना देखील असेल हाच भोगावे लागत होते. परदेशात जाऊन पैसा कमवला, स्वदेशी परत आला तर दुष्काळ पडला होता. कुटुंबाची वाताहत झाली होती. खाण्या-जेवण्याची सोय लागेना पुन्हा तिसरे लग्न केले. हा वृद्ध झाला, थकला, पण त्याची बायको वयात आली-घरात मोठी मुले, सारखी भांडणे होत एक मुलानी बापाला मारलं. शेवटी हिस्से वाटण्या कराव्या लागल्या. याच्या वाट्याला झोपडीत राहणे आले परचक्र लुटालूट, बायकेाला पळवून नेणे, भ्रष्ट करणे जेवढे अनिष्ट व्हावयाचे तेवढे झाले. याची अवस्था केव्हा एकदा मरतो अशी झाली. जन्मभर सुखासाठी धडपडला. अंतकाळापर्यंत दु:ख भोगत राहिला. दु:ख नाहीसे करण्यास भक्तीची गरज लागते, त्या भक्तीपासून दूर राहिला. संसार फार कठीण आहे, हे जिवाची जेव्हा दुर्दशा होते, तेव्हा कळते म्हणून भगवंताला शरण जावे. तारुण्य गेले; बळ गेले संसार करण्याची हौस गेली. शरीर आणि संपत्ती याचा नाश झाला.

 
 
जन्मभराच्या स्वार्थाची वाट लागली. जन्मभर सुखासाठी श्रम केले पण अखेरीस दु:खाने यातना सोसाव्या लागल्या. तात्पर्य काय, जन्म हाच सार्‍या दु:खाचे कारण आहे. प्राणी जन्मला की त्याला दु:खाच्या आगीचे चटके बसतातच म्हणून शहाणपणाचा मार्ग स्वीकारावा, स्वत:चे कल्याण करून घ्यावे. बालपण तरुणपण, म्हातारपण या अवस्थातून सर्वांचा प्रवास होतो. उमेदीचा तरुणपणाचा काळ, रम्य ते बालपण म्हणून बालपणीचा काळ मोठा मोहक असतो, हवाहवासा वाटतो, पण म्हातारपणाचा काळ अतिशय दयनीय, लाचारीचा असतो, भयंकर असतो. म्हणून प्रत्येकाने भगवंताला शरण जावे. गर्भावस्थेमध्ये जिवाला जो पश्चात्ताप होतो, ताच पुुढे त्याला म्हातारपणी होतो. अंतकाळी जिवाला पश्चात्तप होतो. यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आईच्या उदरांत काही काळ राहावे लागते. तरुन जाण्यास अत्यंत कठीण असा हा संसार पुन्हा त्याच्या वाट्याला येतो. भगवंताच्या भक्तीशिवाय जन्म-मरणाच्या खेपा चुकत नाहीत. ‘पुनरपि जनन, पुनरपि मरण’ हे टाळायचे असेल, आपला जीवनाचा शेवटचा टप्पा सुखात, आनंदात, समाधानात जावा, असे वाटत असेल तर तारुण्यापासूनच या काळाची तरतुद करून ठेवावी. प्रपंच नेटका करता करता भगवंतासाठी थोडा वेळ काढावा. दु:ख कुणालाच नको असते. प्रत्येक माणुस सुखाच्या मागे धावतो, सुखासाठी धडपडतो. परंतु जितका तो सुखाच्या मागे जातो तितके सुख त्याच्यापासून दूर जात तारुण्याच्या उन्मादात सुद्धा ईश्वराचे विस्मरण होऊ देता कामा नये. कारण श्रीसमर्थांनी प्रत्येक जिवाची म्हातारपणी होणारी दीनवाणी अवस्था अत्यंत मार्मिक शब्दात वर्णन केली. समर्थ म्हणतात,
डोळा पाहता दिसेना। कानी शब्द ऐकेना
शक्ती पायांची गेली। बैसवेना मुरूकुंडी घाली।
ऐसे वृद्धपण सकळांस आहे दारूण।
म्हणोनिया शरण। भगवंतास जावे।।
जय जय रघुवीर समर्थ
 वृषाली विनयराव मानेकर
9527597412
श्रश्र