अभिनंदनला 'बीसीसीआय' ची अनोखी सलामी
   दिनांक :02-Mar-2019
नवी दिल्ली :
 शुक्रवारी रात्री सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना वाघा बॉर्डरहून भारताच्या स्वाधीन केले. अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या शौर्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज होता.

 
 
 
बीसीसीआयने या वीरपुत्रला अनोखी सलामी दिली आहे. बीसीसीआयकडून शुक्रवारी भारतीय संघासाठी नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली. या जर्सीवर विंग कमांडर अभिनंदन यांचे नाव लिहिले आहे आणि जर्सीचा नंबर एक आहे. दरम्यान, ही जर्सी परिधान करुन भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. सध्या ही जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत आह. 'अभिनंदन तुझे मायदेशी स्वागत आहे. तू आकाशावर राज्य करतो. त्याचप्रमाणे तू आमच्या सर्वांच्याच ह्दयावरही राज्य करतो. तुझे धैर्य आणि शौर्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.' असे बीसीआयने ट्विट केले.