व्हाट्सअँपवर क्रिप्टोकरन्सीचा वापर करता येणार
   दिनांक :02-Mar-2019
व्हाट्सअँप वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिप्टोकरन्सीचा वापर आता व्हाट्सअँपवर करता येणार आहे. लवकरच  फेसबुक व्हाट्सअॅपवर डिजीटल कॉइन्स आणणार असून यामुळे व्हाट्सअॅपवरही पैशांचे व्यवहार करता येणार आहेत.
  
 
 
इंटरनेटवर क्रिप्टोकरन्सीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आता डिजीटल पैशांचे व्यवहारही करता येतात. त्याच आधारावर फेसबुकही आता नवीन डिजीटल कॉइन्स व्हाट्सअॅपवर आणणार आहे. हे डिजीटल कॉइन्स मॅसेजप्रमाणेच समोरच्याला पाठवता येतील. प्रत्येक कॉइनचे डॉलरमध्ये व संबंधित देशांच्या चलनामध्ये काहीतरी मुल्य असेल. यानुसार ठराविक कॉइन्स पाठवून पैशांचे व्यवहार आता करता येणार आहेत.
याबद्दल विचारले असता फेसबुकने काहीही प्रतिक्रिया द्यायचे टाळले आहे. तर ही कल्पना प्रायोगिक तत्वावर राबवली जात असून ती यशस्वी झाल्यास ती प्रत्यक्षात येईल अशी माहिती व्हाट्सअॅपमधील सूत्रांनी दिली आहे.