नीलगाय आणि दुचाकी ची जोरदार टक्कर
   दिनांक :02-Mar-2019
 
 
अहेरी: 
आलापल्ली जवळील लभान तांडा गावाजवळ नीलगाय आणि दुचाकी स्वाराची जोरदार टक्कर. नीलगाय जागीच ठार झाली असून दुचाकीस्वार राजेश बाबुराव गंपावर हे गंभीर जख्मी आहेत.त्यांना चंद्रपुर ला उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. सदर नीलगाय गरोदर असल्याचे किंवा नुकतेच पिल्लांना जन्म दिले असावे असे सांगितले जाते. उन्हाळा सुरु होताच जंगलातील अनेक वन्य प्राणी पाण्याच्या शोधात फिरत असतात शिवाय जंगलात लागनारी आग यामुळे ही प्राण्यांचे जगने मुस्किल झाले आहे. आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या अहेरी रेंज मध्ये आज ही घटना घडली यात दुचाकी स्वार गंभीर जखमी असून त्यांची सद्य परिस्थिती कळू शकली नाही.