पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार; तीन नागरिकांचा मृत्यू
   दिनांक :02-Mar-2019
जम्मू -काश्मीर :
 
 सीमेवर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.जम्मू-काश्मीरमधील मेंढर, उरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार केला. या गोळीबारात पुंछ जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सकडून सामान्य नागरिकांना लक्ष केले. त्यांच्याकडून ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारने हल्ला केला जात आहे. पुंछ जिल्ह्यातील सलोत्रीमध्ये मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. यात एकाच परिवारातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे पाच जवान शहीद झाले. शहीद झालेल्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचा (सीआरपीएफ) एक निरीक्षक आणि जवान, त्याचबरोबर लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. चकमकीत चार जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.