म्हणून पाकिस्तानने अभिनंदनला सोडण्याची वेळ दोनदा बदलली
   दिनांक :02-Mar-2019
नवी दिल्ली :
 भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना तीन दिवसांनंतर भारताला सोपविण्य़ात आले. पाकिस्तानने दोन वेळा सोडण्याची वेळ पुढे ढकलले होते. याचे कारण पुढे आले आहे. अभिनंदन यांचा जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना वाघा बॉर्डरवर थांबवून ठेवण्यात आले होते. अभिनंदन यांनी ९ वाजून २१ मिनिटांनी भारतीय भूमीत पाऊल ठेवले. त्यांना तेथून दिल्लीला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले आहे.

 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव वाढल्याने अभिनंदन यांना जिनिव्हा करारानुसार भारताकडे सोपवावे लागले. शुक्रवारी सायंकाळी त्यांना भारताकडे सोपविण्यात येणार होते. मात्र, वाघा बॉर्डरवर आणूनही त्यांना सोडण्याची वेळ दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. व्हिडियो रेकॉर्डिंगसाठी अभिनंदनला सोडण्याची वेळ  होती. या व्हिडिओमध्ये त्यांना काय बोलायला लावले, याबाबत अद्याप समोर आलेले नसले, तरीही हा व्हिडिओ पाकिस्तान त्यांची बाजू मांडण्यासाठी वापरण्याची शक्यता आहे.