पाकिस्तानातील जनतेने भारतीय समजून आपल्याच वैमानिकाला केले ठार
   दिनांक :02-Mar-2019
 पाकिस्तानने ताब्यात घेतलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुखरुप भारतात परतले. मात्र पाकिस्तानी वैमानिकाला मृत्यूला सामोर जावे लागले. पाकिस्तानी जनतेने भारतीय समजून आपल्याच वैमानिकाला ठार केले.
 
 
पाकिस्तानी हवाई दलाचे वैमानिक शाहनाज एफ १६ विमानाचे उड्डाण करत होते. भारतीय विमानाने यावेळी एफ १६ विमानाचा वेध घेतला होता. यानंतर शाहनाज यांनी पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये लँण्डिंग केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शाहनाज सुखरुप खाली उतरण्याआधीच जखमी झाले होते. त्यांचा गणवेशही फाटला होता. यावेळी तेथील लोकांना हा भारतीय वैमानिक असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शाहनाज यांचा मृत्यू झाला.
 
भारतीय वैमानिक अभिनंदन यांनाही पाकिस्तानी जनतेने घेरले होते. मात्र ऐनवेळी पाकिस्तानी लष्कराने तिथे पोहोचून त्यांना आपल्या ताब्यात घेतले होते. पण शाहनाज दुर्देवी ठरले. भारतीय वैमानिक अभिनंदन यांच्याप्रमाणे शाहनाज यांचेही कुटुंब सैन्यात आहे. त्यांचे वडील पाकिस्तानी हवाई दलात होते. त्यांनी मिराज आणि एफ १६ विमानांचे उड्डाण केले आहे.