युट्रेक्ट हल्ला प्रकरणी आणखी एकास अटक
   दिनांक :20-Mar-2019
युट्रेक्ट;
 
 
 
नेदरलॅण्डमधील युट्रेक्ट येथे ट्रामवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली असून, हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुन्ह्यासाठी वापरलेल्या कारमध्ये एक संशयास्पद पत्र पोलिसांना सापडले आहे. ही कार तुर्कस्थानमधील मुख्य संशयित गोकमन टेनिस याची आहे. या हल्ल्यामध्ये गुंतल्याच्या संशयावरून एका व्यक्तीस अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली जात आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्तींना चौकशी केल्यावर सोडण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.