फ्रान्सच्या पाठोपाठ जर्मनीची भारताला साथ
   दिनांक :20-Mar-2019
 फ्रान्सने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जर्मनीने अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला पाठिंबा दिला आहे. मसूद अझहरचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी युरोपियन युनियनमध्ये चर्चा सुरु आहे.
 
 
आमचा फ्रान्सबरोबर समन्वय असून आम्ही सकारात्मक आहोत असे जर्मन दूतावासातील प्रवक्ते हॅन्स ख्रिस्टीयन विनक्लेर यांनी सांगितले. युरोपियन युनियनमधील सर्व सदस्यांचे एकमत झाल्यानंतर सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाईल असे हॅन्स यांनी सांगितले. आपल्या नकाराधिकाराचा वापर करुन चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यामध्ये खोडा घातला.
 युरोपियन युनियन आधी संयुक्त राष्ट्राच्या यादीत नसलेले दहशतवादी आणि संघटनांचा आपल्या यादीत समावेश करत नव्हती. पण मागच्या काही वर्षात नियमांमध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार सर्व सदस्य सहमत असतील तर दहशतवादाशी संबंधित असलेल्याचा यादीमध्ये समावेश करता येऊ शकतो.