भारतीय वंशाचे जगमीतसिंग कॅनडाच्या संसदेत
   दिनांक :20-Mar-2019
ओटावा;
 देशाच्या प्रमुख विरोधी पक्षाचे पहिले अश्वेत नेते म्हणून पदार्पण करीत भारतीय वंशाच्या जगमीतसिंग यांनी कॅनडामध्ये राजकीय इतिहास घडवला आहे.त्यांनी सोमवारी कॅनडाच्या संसदेत प्रवेश करताच, सर्व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. योगायोगाने त्याचवेळी पंतप्रधान जस्टीन ट्रुंडोव यांनी एका ज्येष्ठ महिला सदस्याचा कॅबिनेटमध्ये समावेश केला.
 
 
 
 
जगमीतसिंग न्यू डेमॉक्रेटिक पार्टीचे नेते आहेत. त्यांनी सोमवारी हृदयावर हात ठेवून प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी कनिष्ठ सभागृहात प्रवेश केला. त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांनी संसदेत पहिले वक्तव्य केले, तसेच दक्षिण बर्नाबी येथील घरांच्या वाढत्या किमतींबद्दल त्यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला.